Ticker

6/recent/ticker-posts

राहेरी बु. ग्रामपंचायतीत 15 वित्त आयोग निधीतून लाखोंचा गैरव्यवहार ?



[   ग्रामपंचायत सरपंचाच्या पतिराजांची कारभारात लुडबूड ...सचिव व सरपंचपतींवर गैरव्यवहाराचा ठपका  ]

सिंदखेडराजा / ज्ञानेश्वर तिकटे

सिंदखेडराजा -- तालुक्यातील राहेरी बु. ग्रामपंचायतीत १५ व्या वित्त आयोगातून आलेल्या निधीच्या खर्चात मोठ्या प्रमाणात तफावत दिसून आल्याने खळबळ उडाली आहे. शासनाच्या विकास निधीचा गैरवापर झाल्याची तक्रार भाजपा तालुकाध्यक्ष आनंद देशमुख यांनी पुराव्यांसह गटविकास अधिकारी मेहकर यांच्याकडे दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, ग्रामपंचायत सचिव दीपक डोंगरदिवे आणि सरपंचपती बालाजी देशमुख यांनी विविध विकासकामांच्या नावाखाली देयक तयार करून, प्रत्यक्षात कोणतीही कामे न करता निधी खात्यातून वळते केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तक्रारीनुसार, ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांमध्ये व निधी वापरामध्ये अनियमितता झाल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. शेतकरी सहल 52,400 रूपये , पत्रा खरेदी 24,230 रूपये , सेग्रीगेशन शेड बांधकाम 1,48,540। रूपये , कचराकुंडी डस्टबिन खरेदी 2,28,000 रूपये, जि.प.रेन वाटर हार्वेस्टिंग 70,000 रूपये आरोग्य साहित्य खरेदी 50,000 रूपये , अंगणवाडी साहित्य खरेदी,शालेय साहित्य, अशा एकूण ८ ते 10 कामात विविध शीर्षाखाली अंदाजे ९ ते १० लाख रुपयांचा निधी कागदोपत्री खर्च दाखविण्यात आला, अशी तक्रार भाजपा तालुकाध्यक्षआनंद देशमुख यांनी केली आहे.

तक्रारदारांनी सादर केलेल्या दस्तऐवजांमध्ये ग्रामपंचायतीच्या खात्याचे तपशील, देयकांच्या तारखा आणि व्हाऊचर क्रमांकांसह सर्व पुरावे जोडले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास आणखी अनेक गैख्यवहार उघड होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.