अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
घनसावंगी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार हिकमत दादा उढाण यांनी नवी दिल्ली येथे भारत सरकारचे रेल्वे मंत्री मा.अश्विनी वैष्णव यांची दि.८ऑक्टोबर राेजी भेट घेतली.या भेटीदरम्यान दादांनी मतदारसंघातील रेल्वे संबंधित महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या मागण्या मंत्र्यांसमोर मांडल्या.
या वेळी पुढील मागण्यांवर विशेष चर्चा झाली
1️⃣ रांजणी रेल्वे स्टेशनजवळ (LC No.89) उड्डाणपूल बांधकाम
2️⃣ लोंढेवाडी (LC No. 82E) येथे रेल्वे उड्डाणपूल उभारणी
3️⃣ जालना–घनसावंगी–परळी रेल्वे मार्गाचा पाठपुरावा व गती
या सर्व प्रकल्पांची अंमलबजावणी झाल्यास घनसावंगी तालुक्यासह परिसरातील नागरिक, शेतकरी,व्यावसायिक व विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल.वाहतूक सुलभ होऊन औद्योगिक विकासालाही चालना मिळेल.या भेटीनंतर आमदार हिकमत दादा उढाण यांनी सांगितले की,
“घनसावंगी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेले सर्व रेल्वे प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
या मागण्या मंजूर झाल्यास मतदारसंघाचे भवितव्य उज्ज्वल होईल आणि नागरिकांच्या ‘चांगल्या दिवसांची’ सुरुवात होईल.”या प्रसंगी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.





Social Plugin