Ticker

6/recent/ticker-posts

दुधना नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित परतूर संस्थेस दिपस्तंभ पुरस्कार



कैलास कोल्हे @ग्रामीण प्रतिनिधी 

मंठा:  दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी डेनिसन्स रिसॉर्ट, कुमटा कर्नाटक या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या आंतरराज्य प्रशिक्षण कार्यक्रमात  भव्य असा दिपस्तंभ पुरस्कार २०२४-२५ सोहळा संपन्न झाला, या सोहळ्यात दुधना नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित परतूर जि जालना या संस्थेस छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा विभागातील गट क्र. १ मधून दिपस्तंभ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशन चे अध्यक्ष काकासाहेब कोयटे,मुख्यकार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे,कर्नाटक पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष यांच्या हस्ते ट्राफी, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

            दुधना नागरी पतसंस्थेस दिपस्तंभ पुरस्कार मिळाल्याबद्दल विजय देशमुख, दादाराव तुपकर,अभय कुलकर्णी,सचिन वाणी, सतीश निर्वळ आदींनी अभिनंदन करून भरभरून शुभेच्छा दिल्या!

          विश्वसनियता, विनयशिलता आणि विनम्रता या त्रिसूत्रीवर चालणाऱ्या दुधना पतसंस्थेच्या यशाचे सर्व श्रेय खातेदार, ठेवीदार, सर्वसामान्य सभासद,हितचिंतक आणि कर्मचारी वृंद यांनाच जाते.