हदगाव तालुका प्रतिनिधी देवानंद महाजन
शेतशिवारात मागील दोन महिन्यांपासून विद्युत रोहित्र जळाल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची तसेच शेतीसाठी आवश्यक विजेची तीव्र समस्या भेडसावत होती.ही माहिती हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार मा. नागेश पाटील आष्टीकर साहेब यांना मिळताच त्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून त्या ठिकाणी नवीन विद्युत रोहित्र बसविण्याच्या सूचना दिल्या.
खासदार साहेबांच्या तत्पर सूचनेनुसार महावितरण विभागाने कोळगाव शिवारात नवीन विद्युत रोहित्र बसवून वीजपुरवठा पुनर्संचयित केला. या कार्यवाहीमुळे कोळगाव परिसरातील शेतकरी खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेबांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करत आहेत.





Social Plugin