Ticker

6/recent/ticker-posts

महानगरपालिकेवर धडक मोर्चा सर्व मागण्या मान्य आयुक्त नवल किशोर राम साहेब

 प्रतिनिधी सोमनाथ काळे पुणे



आमच्या हक्काचे पाणी आणि इतर मूलभूत सुविधा आम्हाला मिळाल्याच पाहिजे...  


'नियमित व मुबलक पाणी मिळणे' हा सर्व नागरिक बांधवांचा हक्क आहे आणि तोच जर मिळत नसेल तर याविरोधात आवाज उठवून संघर्ष करून तो हक्क मिळवला पाहिजे. आज याच पाण्याच्या मूलभूत हक्कासाठी पुणे महानगरपालिकेवर 'धडक मोर्चा' नेला. या दरम्यान, पाणी, रस्ते, आरोग्य, उद्याने, स्मशानभूमी, लोहगाव, वाघोली सह समाविष्ट गावांचा विकास आरखडा इ. संदर्भातील मागण्या पालिका प्रशासनासमोर ठेवल्या. वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित मागण्या पूर्ण होत नसल्याने महापालिका प्रशासनाचा दशक्रिया विधी करू निषेध व्यक्त केला. सोबतच काही सहकाऱ्यांनीही अर्धमुंडन करून आपला असंतोष व्यक्त केला.  


त्यानंतर पुणे महानगरपालिका श्री. आयुक्त नवल किशोर राम साहेब यांच्यासमवेत मागण्यांबाबत सविस्तर चर्चा पार पडली. चर्चेदरम्यान, सर्व मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत तत्काळ उपाययोजना करण्याचे तसेच, मतदारसंघातील विकासकामांचा पाहणी दौरा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. विशेषतः पाणीपुरवठा नियमित करण्यासह गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या पाण्याच्या टाक्यांची कामे जलदगतीने पूर्ण करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, रस्ते, रुग्णालये, स्मशानभूमी, ड्रेनेज, नालेसफाई, मिळकत कर इ. कामांबाबत तपशीलवार चर्चा केली. मागण्यांच्या संदर्भाने लवकरच प्रत्यक्ष पाहणी करून सर्व प्रलंबित विकासकामे पूर्ण केली जातील, असेही आयुक्त साहेबांनी सांगितले आहे.


आंदोलन प्रसंगी ज्येष्ठ नेते श्री. प्रकाश म्हस्के, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री. नानासाहेब आबनावे, श्री. संतोष भरणे, श्रीमती वसुंधरा उबाळे, श्रीमती मीना सातव, माजी नगरसेवक श्री. राजेंद्र शिरसाट, श्री. सुनिल मलके, श्री. महेंद्र पठारे, श्री. हनिफ शेख, श्री. डॅनियल लांडगे, श्री. संतोष आरडे, श्री. भैय्यासाहेब जाधव, श्री. संजय देशमुख, श्रीमती रेखा टिंगरे, श्री. चंद्रकांत टिंगरे, श्री. सचिन भगत, श्री. किशोर विटकर, श्री. विशाल मलके, श्री. राजेंद्र खांदवे, श्री. शिवदास उबाळे, माजी उपसरपंच श्री. प्रितम खांदवे, अॅड. श्री. नानासाहेब नलावडे, श्री. सागर खांदवे, श्रीमती  शिवानी माने, श्री. विक्रांत भोसले, श्रीमती पम्मी परांडे, श्री. दत्ता परांडे, श्री. संजय गलांडे, अॅड. श्री. रेगे, श्रीमती कमल जगदाने, श्री. अरुण पठारे, श्री. संजय माने, श्री. केशव राखपसरे, श्री. प्रकाश सोनवणे, श्री. अजहर खान, श्री. सुभाष ठोकळ, श्री. विल्सन चंदेवाल, श्री. सुभाष काळभोर, श्री. जालिंदर कांबळे, श्री. निखिल गायकवाड, श्री. संतोष सुकाळे, संकेत गलांडे, श्री. निलेश जठार व मतदारसंघातील नागरिक बांधव उपस्थित होते.


#mlabapusahebpathare #vadgaonsheri #आंदोलन #मनपा #PMC