Ticker

6/recent/ticker-posts

एक हात मदतीचा ज्ञान गंगा इंग्लिश मेडियम स्कुल आणि जूनियर कॉलेज आळंदी पूरग्रस्तांना मदतीचा हात



पुणे प्रतिनिधी ( सोमनाथ काळे )

 आळंदीतुन एक हात मदतीचा उपक्रमात सहभागी होत ज्ञानगंगा इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आळंदी तर्फे मराठवाड्यातील काही जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पुरग्रस्त बंधू भगिनींना सुद्धा आपल्या प्रमाणे सण उत्सव साजरे करता यावे व त्यांचाही सण गोड व्हावा म्हणून आपल्या सर्वांचे सामाजिक कर्तव्य व सहकार्य म्हणून गोड शिधा गोळा केला. 

यामध्ये सर्व शिक्षक, पालक,विद्यार्थी यांनी  सढळ हाताने मदत केली. संस्थेचे संस्थापक ,अध्यक्ष विजय गुळवे यांनी विशेष भरीव मदत केली जमा झालेल्या शिधा संस्थेचा वतीने पूरग्रस्तापर्यंत पोहोचविण्यासाठी आळंदी ग्रामस्थाकडे सुपूर्द करण्यात आला यावेळी  सामाजिक कार्यकर्ते किरण शेठ येळंवडे, निसार सय्यद, अरुण कुरे, नाना तापकीर, शाळेचे संस्थापक विजय गुळवे सर, यांच्या कडुन पुरग्रस्थ गावांमध्ये मदतीचा एक हात शाळेच्या वतीने सुपुर्द करण्यात आला आहे.