प्रतिनिधी :- लक्ष्मण बिल्हारे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वलखेड येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ध्येयासाठी तसेच उत्तम प्रकारचे दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सर्व शिक्षक वृंद तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी अतोनात प्रयत्न करत आहे.सध्याच्या युगामध्ये पालकांची मनस्थिती जिल्हा परिषद शाळेच्या विरुद्ध होताना दिसत आहे प्रत्येकांना वाटते आपला मुलगा सुशिक्षित व्हावा यासाठी सर्वच पालकांचा कल सध्या खाजगी संस्था व इंग्लिश मीडियम च्या शाळेमध्ये दिसत आहे.ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे असे पालक आपल्या मुलांना शिक्षणासाठी शहरांमध्ये पाठवताना दिसत आहेत.
परंतु शेतमजूर कष्टकरी गोर गरीब जनतेच्या मुलांना सुद्धा मोफत दर्जेदार व शिस्तबद्ध शिक्षण देण्यासाठी वलखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सध्या बदल होत आहे आणि येणाऱ्या काळात नक्कीच इंग्लिश मीडियम प्रमाणे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनाही शिक्षण दिल्या जाणार आहे जशा सध्या शहरी भागातील शाळेमध्ये सुविधा असतात तशाच सुविधा आपल्या या जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा देण्याचे प्रयत्न चालू आहेत तरी या येणाऱ्या शैक्षणिक वर्षांमध्ये पालकांनी आपल्या मुलांना शहरी भागात शिक्षणासाठी न पाठवता गावातील शाळेमध्ये त्यांचा प्रवेश करावा कारण जर जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होत गेली तर भविष्यात या सरकारी शाळा बंद पडतील व खाजगी शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी भरपूर असा खर्च करावा लागतो खाजगी संस्थेमध्ये मुलांना बूट सॉंग्स गणवेश शालेय पुस्तक स्कूल बॅग गाडीभाडे तसेच शालेय फिस हा खर्च जवळपास वार्षिक अंदाजे ५०.०००/- रुपये येत आहे आणि हेच शिक्षण आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मोफत मिळत आहे सध्या आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी शालेय गणवेश, बूट,सॉक्स व पाठ्यपुस्तक मोफत दिले जातात तसेच शाळेमध्ये पिण्यासाठी फिल्टरचे पाणी, सध्या तंत्रज्ञानयुग लक्षात घेता या विद्यार्थ्यांसाठी संगणकाची सुद्धा व्यवस्था झालेली आहे आज आपल्या या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसवण्यात आले असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक श्री.एस. एस. खवल सर यांनी सांगितले
तरी गावातील सर्व नागरिकांनी आपल्या मुलांचा प्रवेश येणाऱ्या शैक्षणिक वर्षांमध्ये गावातील जिल्हा परिषद शाळांमध्ये करुन शाळेला सहकार्य करावे अशी विनंती शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष :- श्री.लक्ष्मण बिल्हारे उपाध्यक्ष:-श्री.सुनिल सुरुंग व शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व सर्व शिक्षकवृंद यांनी केली





Social Plugin