विशाल पाटील@पन्हाळा तालुका प्रतिनिधी
पोर्ले गावात स्थित असलेले मरगाई मंदिर या मंदिराकडे गेली 30 वर्षे प्रशासनाने दुर्लक्ष केले मंदिरा पुढे इतकी वाईट अवस्था होती की पाय ठेवला की पाय घोट्या ऐवढा पाय इतका घानी मध्ये आत जायचा नागपंचमी असुदे नवरात्री, दसरा इतक्या मोठ्या सणाला सुद्धा नागरिकांना मंदिराध्ये दर्शना साठी जाता येत नव्हते तरी कोणीही मंदिरा ला फंड लावला नाही शेवटी मरागाई मंदिरा जवळ असणारा मरगाई तरुण मंडळ या मंडळा ने कोणाकडे ही फंड मागायला जायचे नाही ठरवले स्वता कर्ज काडायला लागले तरी चालेल ही भावना डोकयामध्ये ठेवून पुढचा मागचा कसला ही विचार न करता मरगाई मंदिराचा जीणोद्धार करायचे ठरवले शेवटी मंडळाला यश आले आणि मंदिराचे काम अत्यंत चांगल्या प्रकारे झाले व आई मरगाई देवी ची सत्यनारायण पुजा मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात पार पडली यावेळी उपस्थित मरगाई मंडळाचे सर्व कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक होते नंतर मरगाई तरुण मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यान मध्ये व परिसरातील लोकांमध्ये एकच चर्चा सुरू होती येनारी वेळेच सांगेल मरगाई तरुण मंडळ म्हणजे काय!





Social Plugin