Ticker

6/recent/ticker-posts

गोरेगाव सर्कल जिल्हा परिषद निवडणूक लढवणार : नागेश कांबळे



 भागवत खांदळे गोरेगाव 30 आक्टो 25 :

-गोरेगाव जिल्हा परिषद गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे. गोरेगाव जिल्हा परिषद गटातून निवडणुक लढवणार असल्याचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचे खंदे समर्थक नागेश कांबळे यांनी सांगितले.

राजकीय राजधानी म्हणून ओळख असलेल्या गोरेगाव गटात चुरस वाढली आहे. जिल्हा परिषद निवडणुक कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असून गोरेगाव गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे गोरेगाव ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्या दिपाली कांबळे यांचे पती

नागेश कांबळे गोरेगाव जिल्हा परिषद गटाची निवडणुक लढवणार असल्याने त्यांनी मतदारांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे.

नागेश कांबळे हे उच्चशिक्षित तरुण सामाजिक कार्यकर्ते असल्याने गोरगरिबांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी धावून जातात.  ते गेल्या पंधरा वर्षांपासून कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत. गोरेगाव जिल्हा परिषद गट अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी मला संधी दिल्यास मी निवडणूक लढवणार असल्याचे नागेश कांबळे यांनी सांगितले. नागेश कांबळे यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरूवात केली आहे.