Ticker

6/recent/ticker-posts

कारंजा लाड शहर पोलिसांची धड़क कारवाई २.३६ लाखांचे मेफेड्रोन जप्त



 कारंजा लाड येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत २ लाख ३६ हजार रुपयांचे मेफेड्रोन (एमडी) अर्थात रासायनिक अंमली पदार्थ जप्त करून दोन जणांना बेड्या ठाकल्या आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण तब्बल ७ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई ३ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास करण्यात आली.

कारंजा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ ऑक्टोबर रोजी शहर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप सहदेव पवार यांनी सरकारतर्फ फिर्यादीत म्हटले की, गुप्त बातमीदारामार्फत त्यांना स्थानिक रिलायन्स पेट्रोल पंप, बायपास ते प्राप्ती हॉटेल दरम्यान एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये (एमएच ३७ व्ही ७७७) दोन इसम अमली पदार्थ एमडी (मेफेड्रोन) घेऊन येत असल्याची माहिती मिळाली. 

त्याबाबत कायदेशीर कार्यवाही करुण दोन सरकारी पंचासमक्ष खबरप्रमाणे नमुद ठिकाणी जाऊन नमुद कारमध्ये बसलेल्या इसमांना पंचासमक्ष नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावे हाशीब उर्फ आरीस खान आसीफ खान (३२ वर्ष रा. फारुख कॉलनी कारंजा) व अनिस खान सत्तार खान (५२, रा. मजीतपुरा कारंजा) असे सांगीतले. त्यावरून कायदेशीर कार्यवाही करून नमुद आरोपी व त्यांच्या ताब्यात असलेल्या कारची पंचासमक्ष इडती घेतली असता एका प्लास्टिक पाउचमध्ये एम. डी. (मेफेड्रोन) वजन २३.६० (किंमत अंदाजे २ लाख ३६ हजार रुपये) मिळून आली. तसेच नमुद आरोपीने गुन्हा करतेवेळी वापरलेली चारचाकी कार (किंमत अंदाजे ५ लाख रुपये) असा एकूण ७ लाख ३६ हजार रुईयाचा मुद्देमाल दोन पंचासमक्ष जप्त केला. यावेळी आरोपी यांना अटक करुण कारागृहात बंद करण्यात आले आहे. तसेच आरोपीविरुध्द कलम ८ (क) २२ (ब) २९ एन.डी.पी. एस. अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करुन तपासात घेतला