Ticker

6/recent/ticker-posts

बंजारा समाजाच्या वतीने रास्ता रोको



*एस टी मध्ये समावेश करण्याची मागणी*

*मालेगाव प्रतिनिधी*जावेद धन्नू भवानीवाले

मालेगाव ता 30 - बंजारा समाजाचा एस टी मध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी आज ता 30 रोजी अकोला - हैदराबाद महामार्गावर व हिंदु हृदय सम्राट स्व बाळासाहेब ठाकरे मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गावर रस्ता रोको दुपारी 1.00 ते 2.30 वाजताच्या दरम्यान करण्यात आला 

स्व बाळासाहेब ठाकरे मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गावर 20 मिनिटांसाठी तर दिड तास अकोला - हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला मालेगाव चे ठाणेदार संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली 500 ते 600 पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा पोलिस बंदोबस्त आंदोलन स्थळी होता 

हैदराबाद गॅझेट लागू करून बंजारा समाजाला त्यांच्या हक्काचे एस टी चे आरक्षण देण्यात यावे यासाठी राज्यात एका महिन्यात एकूण 56 मोर्चे काढण्यात आले मात्र त्याची दखल शासनाने घेतली नाही आता राज्य सरकारने बंजारा समाजाचा एस टी मध्ये समावेश करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली 

सुरुवातीला 30 मिनिटांसाठी हिंदू हृदय सम्राट स्व बाळासाहेब ठाकरे ठाकरे समृद्धी महामार्गावर रस्ता रोको करण्यात आला त्यानंतर अकोला - हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको करण्यात आला 

या आंदोलनात पोहरादेवी येथील महंत , बंजारा समाजातील सर्व संघटनांचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी यांच्यासह अकोला, वाशिम,बुलडाणा, यवतमाळ, अमरावती, हिंगोली आदी जिल्ह्यातील बंजारा समाज बांधव सहभागी झाले होते

यावेळी महंत कबिरादास महाराज महंत संजय महाराज बंजारा क्रांती दलाचे कांतीलाल नाईक, तांडा सुधार समितीचे सचिव नाना बंजारा, धाडी समाजाचे अध्यक्ष राजू रत्ने, प्रा अनिल राठोड साहित्यिक डॉ विजय जाधव, डॉ सचिन पवार, बंजारा कवी , बंजारा आरक्षण कृती समितीचे श्रावण जाधव सेवाराम आडे आदी यावेळी उपस्थित होते