रत्नाकर कवठाळे ग्रामीण प्रतिनिधि
दिनांक. 8ऑक्टोबर 225 ता. उदगीर येथील बामणी. गावात प्रति वर्षा प्रमाणे आद्य कवी महर्षी वाल्मीक ऋषि यांची सार्वजनिक जयंती मोठ्या उत्सवाने करण्यात आली. दि.6 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी नामांकित ह.भ.प.परमेश्वर महाराज शहापूरकर यांचे कीर्तन व हरिजागराचे कार्यक्रम झाले. आणि कोजागिरी पौर्णिमेचे अवचित्य साधून प्रति वर्षा प्रमाणे गावातील सर्व भाविकांना तीर्थ रूपी दुधाचे प्रसाद वाटप करण्यात आले.
कारण असे मानले जाते की कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री दुध पिण्याचे विशेष महत्व आहे. व सकाळी श्री खंडोबा मंदिर येथे महाप्रसाद ठेवण्यात आले. याच प्रकारे बामणी गावात सर्व महापुरुषांच्या सार्वजनिक जयंत्या मोठ्या उत्साहाने केले जातात. याचे श्रेय गावातील सर्व तरुणाईला जातो. करण बामणी गावातील तरुण खूप मेहनती व होतकरू आहेत. सर्व महापुरुषांचा आदर करणारे आहेत. तसेच सार्वजनिक कार्यात आपली जबाबदारी समजून कार्य करणाऱ्या आहेत.





Social Plugin