Ticker

6/recent/ticker-posts

प पू काशीनाथ बाबाची पुण्यतिथी साजरी



*8 हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ*

 प्रतिनिधी  जावेद भवानीवाले 

मालेगाव ता 10 - प पू काशीनाथ बाबा यांची पुण्यतिथी प पू काशीनाथ बाबा संस्थान खिर्डा येथे आज ता 10 रोजी साजरी करण्यात आली पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त महाप्रसादाचे वितरण करण्यात आले त्याचा लाभ 8 हजार भाविकांनी घेतला 

प पू काशीनाथ बाबा संस्थान खिर्डा मालेगाव -- नागपूर राज्य महामार्गावर मालेगाव शहरापासून 6 किलोमीटर अंतरावर आहे. समाधीमंदिर टेकडीवर आहे मंदिर परिसरात सभामंडप बांधण्यात आला आहे समाधी मंदिरा लगत ध्यान मंदिर आहे 

सकाळी सूर्योदयाबरोबर प पू काशीनाथ बाबा यांच्या समाधीला व त्यांच्या मुर्तीला अभिषेक करण्यात आला 

दुपारी महाप्रसादाचे पूजन माजी आमदार ॲड विजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले 

त्यानंतर दर्शन बारीमध्ये मध्ये महाप्रसादाचे वितरण करण्यात आले महाप्रसादाचा लाभ 8 हजार भाविकांनी घेतला. महाप्रसाद वितरणासाठी खिर्डा व परिसरातील भाविकांनी परिश्रम घेतले 

फोटो ओळी -- प पू काशीनाथ बाबा व महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला