विशाल पाटील@पन्हाळा तालुका प्रतिनिधी
रविवार दि.2 नोव्हेंबर 2025 (यवलूज ता.पन्हाळा)
यवलूज गावातील कु.रोहित पांडुरंग पाटील (वय वर्ष 23). हा शेतामध्ये काम करत असताना त्याला विषारी घोणस चावल्याने जागीच मृत्यू झाला. तो आई वडिलाना एकुलता एक होता त्याची घरची परिस्थिती एकदम बिकट आणि हलाखीची आहे. तो शिक्षण घेत शेतातील कामे करत वडिलांना हातभार लागावं म्हणून प्रत्येक कामात मदत करत होता. तो अत्यंत शांत, कष्टाळू व मनमिळावू स्वभावाचा होता. त्यामुळे आसपासच्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एकुलता एक मुलाचा अचानक मृत्युने आई वडील हे पूर्णपणे खचून गेले आहेत. त्याच्या पाठीमागे आई,वडील,आज्जी व बहीण आहे.





Social Plugin