Ticker

6/recent/ticker-posts

सातारा लॉन्ड्री संघटना जिल्हाध्यक्षपदी पुसेगावचे चंद्रकांत शेडगे यांची निवड



पुसेगाव दि . [प्रतिनिधी ]  

महाराष्ट्र परीट धोबी समाज लॉन्ड्री संघटना सातारा जिल्हाध्यक्षपदी पुसेगाव येथील चंद्रकांत शेडगे यांची निवड करण्यात आली. नुकताच पदाधिकारी नियुक्ती मेळावा कराड येथे उत्साहात पार पडला, समाजाच्या एकीचा संदेश देत झालेल्या या मेळाव्यात नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नियुक्तीपत्र देताना महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाचे प्रदेशाध्यक्ष खंडेराव कडगल, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश जाधव, सचिव सुनील फंड, बबनराव शिंदे आप्पा संचालक कृष्णा सहकारी साखर कारखाना लिमिटेड रेठरे बुद्रुक, श्री संत गाडगे महाराज समाज सेवा संस्था सातारा अध्यक्ष दिलीपराव काटकर, जिल्हाध्यक्ष महेश सुळे, गणेश जाधव, अरविंद शेडगे, हनुमंत साळुंखे, अनिल साळुंखे, भरत लोखं-साळुंखे, वनारसे, कैलास ठोंबरे पत्रकार जयवंत पिसाळ, सुनील परीट, , संतोष भालेकर, संजय अमर महाराष्ट्र परिट (धोबी)  अरविंद राक्षे, वसंत गहिने, महिला प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णा सावर्डे .संघटनात्मक बळकटीचा संकल्प या मेळाव्यात करण्यात आला, सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून समाज बांधव महिला आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितहोते. समाजातील ऐक्य प्रगती आणि संघटनात्म क बळकदीचा संकल्प यापुढील काळामध्ये मोठ्या प्रमाणात राबवण्याचा व्यक्त करीत मेळाव्याला उत्साहपूर्वक वातावरण लाभले. या मेळाव्या प्रसंगी विविध मान्यवर आणि आपले विचार व्यक्त केले.