बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
डिस्कळ येथील श्री शिवाजी विद्यालयाची विद्यार्थिनी व सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक श्री मोहन वाघ पाटील वरुड ( लोणी ) यांची सुकन्या सौ.सुषमा वाघ - कदम यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( M P S C ) परीक्षेत उज्वल यश संपादन केले असून त्यांची राजपत्रित अधिकारी म्हणून निवड झाली आहे. सौ.सुषमा सध्या मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी त्यांनी चार वेळा M P S C परीक्षेत विविध पदांसाठी यश प्राप्त केले होते. परंतु राजपत्रित अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न यावेळी साकार झाले आहे.
बंधू तुषार केंद्रीय लोकसेवा आयोगांतर्गत उच्चपदस्थ अधिकारी म्हणून दैदिप्यमान कामगिरी बजावत आहेत. तसेच बहिण सौ.रेश्मा वाघ - कणसे या भारतीय जीवन विमा ( L I C ) मध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तसेच सौ. निलिमा वाघ - देवकर या सांगली येथे लघु पाटबंधारे विभागात उच्च पदावर कार्यरत आहेत.सौ.सुषमा यांनी सुयश प्राप्त केल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तसेच डिस्कळ येथील श्री शिवाजी विद्यालयाची माजी विद्यार्थिनी म्हणून सार्थ अभिमान असल्याने शिक्षकांनी तिचे कौतुक केले. वरुड ( लोणी ) येथील वाघ पाटील परिवारातील मुले - मुली सर्वजण उच्चपदस्थ अधिकारी झाल्याचा आनंद वडील श्री मोहन वाघ सर यांनी व्यक्त केला.





Social Plugin