बुध दि [प्रकाश राजेघाटगे]
महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज,डॉ . बाबासाहेब आंबेडकरी विचाराचा वारसा जपणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी आंबेडकरी चळवळीमध्ये खूप मोठे योगदान दिलेले आहे. त्यामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीमध्ये कार्य असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील नेत्यांचा खूप मोठे योगदान आहे. परंतु पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या विस्तारीकरणासाठी आणखीन एक रिपब्लिकन योद्धा पक्षातून बाहेर पडला आहे. घरगुती व व्यक्तिगत कारणास्तव त्यांनी राजीनामा दिला आहे.
याबाबत माहिती अशी की, सातारा जिल्ह्यामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी कार्यरत असणारे रमेश अनिल उबाळे यांनी खऱ्या अर्थाने जिल्ह्यातील राजकारण- समाजकारण व सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नाव प्रकाश झोतात आणले. यापूर्वी रिपब्लिकन चळवळीचे धाडसी नेते संजय गाडे, राजेश कांबळे , विशाल भोसले, किरण आगीडकर, नितीन रोकडे, पलाश गायकवाड, महेश रणदिवे यांच्यासह अनेक मान्यवरांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जडणघडणीमध्ये सिंहाचा वाटा उचलला होता. आज विविध क्षेत्रात ते चमकदार कामगिरी करत आहेत.
सध्या सातारा जिल्ह्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टी म्हणजे एक स्वतंत्र बेट झालेले आहे. त्याचे विस्तारीकरण झपाट्याने होत असल्यामुळे कोणतीही अडचण येऊ नये. यासाठी कुणावरही टीका टिपणी न करता राजकीय व सामाजिक कार्य पुन्हा नव्या जोमाने करण्यासाठी हा राजीनामा श्री रमेश उबाळे यांनी दिलेला आहे.
पीपल्स रिपब्लिकन पार्टी पक्षाचे प्रतिमा उजळण्यासाठी त्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य, गोरगरिबांना वैद्यकीय मदत मिळावी. यासाठी अर्थसहाय्य व वैद्यकीय क्षेत्राला लागणारी मदत त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी सेवा सुरू करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. आंबेडकरी चळवळीशी ज्या ज्या वेळी हल्ले झालेले आहेत. त्या वेळी प्रतिउत्तर देण्यासाठी त्यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. संविधान संघर्ष मोर्चामध्ये हिरारीने भाग घेऊन समाज बांधवांच्या आवाजामध्ये आवाज मिसळून जनतेच्या लढा साठी व्यक्तिगत स्वार्थ बाजूला ठेवला. एवढेच नव्हे तर मागासवर्गीय व बहुजन समाजाच्या वाड्या वस्तीमध्ये होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात बंड करून उपोषण केले. महामार्गावरचे होणाऱ्या अपघातामुळे अनेकांचे प्राण गेले जखमी अवस्थेत त्यांना कितपत पडावे लागले. त्यांचा आवाज म्हणून अमर उपोषण केले. हे करत असताना अनेकदा तडजोडीसाठी निमंत्रण देण्यात आले. परंतु, पक्षाची शिस्त व आंबेडकरी चळवळीचे असणारी बांधिलकी हेच अंतिम सत्य समजून या तडजोडीला लाथ मारली. असे अनेक जण यांच्यासह रिपब्लिकन योद्धा रमेश अनिल उबाळे यांनी इतर राजकीय पक्षांमध्ये यावे यासाठी अनेकांनी त्यांना ऑफर दिलेली आहे.
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते आदरणीय जोगेंद्र कवाडे सर, आदरणीय जयदीप कवाडे सर व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नंदकुमार गोंधळी व अनेक मान्यवरांनी सहकार्य केल्यामुळेच या पार्टीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. भविष्यातही सर्व सामुदायिक निर्णयांमध्ये सक्रिय सहभाग घेताना कोणाबद्दलही दुजाभाव राहणार नाही. असे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांच्या राजीनाम्यामुळे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पद रिक्त झाले असून या पदावर रिपब्लिकन सक्षम कार्यकर्त्याला संधी मिळावी. अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. लवकरच भविष्यातील राजकीय- सामाजिक निर्णय सर्व कार्यकर्त्यांशी विचार विनिमय करून घेण्यात येईल असाही विश्वास श्री रमेश अनिल उबाळे यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना दिला आहे. यापुढेही अन्यायाविरोधात तीव्रतेने लढा उभारण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे असेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले.





Social Plugin