Ticker

6/recent/ticker-posts

वाढदिवसानिमित्त विविध प्रकारची फुलझाडे महाविद्यालयास भेट



 छायाचित्र - पुसेगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात कार्यालयीन प्रमुख श्री.किशोर शिंदे यांनी  आपल्या वाढदिवसानिमित्त विविध प्रकारची फुलझाडे महाविद्यालयास भेट दिल्याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर. पी भोसले, रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद प्रा.डॉ.संजय क्षीरसागर व प्रशासकीय सेवक , विद्यार्थी छाया - प्रकाश राजेघाटगे श्री. किशोर शिंदे यांच्या  ५३ व्या वाढदिवसानिमित्त पुसेगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयास फुल झाडाची भेट....... 

  बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

कला व वाणिज्य महाविद्यालयातील कार्यालय प्रमुख श्री किशोर शिंदे यांचा  उत्साहपूर्ण वातावरणात एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या निमित्ताने श्री. शिंदे यांनी महाविद्यालयाच्या परिसराचे सौंदर्यवर्धन व पर्यावरण संवर्धनाचा संदेश जपण्यासाठी विविध शोभिवंत व फुलझाडांची सप्रेम भेट महाविद्यालयास दिली. त्यांच्या या उपक्रमामुळे महाविद्यालय परिसर आणखी हिरवागार व सुखद होण्यास निश्चितच हातभार लागणार आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर. पी. भोसले यांनी  श्री.किशोर  शिंदे यांचे मनःपूर्वक स्वागत करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद प्रा डॉ.संजय क्षीरसागर यांनीही शुभेच्छा दिल्या .त्यानंतर  महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ  देऊन त्यांचा सत्कार केला. महाविद्यालयात नेहमीच सकारात्मक वातावरण निर्माण करून कर्मचारी व विद्यार्थ्यांमध्ये सुसंवाद वाढविण्याचे काम श्री. किशोर शिंदे करीत असल्याचे प्राचार्य डॉ.आ. पी.भोसले यांनी आपल्या भाषणात नमूद केले.

श्री.शिंदे यांनी दिलेल्या फुलझाडांच्या भेटीत विविध ऋतुमानानुसार फुलणारी रोपे, औषधी वनस्पती तसेच सजावटी झाडांचा समावेश होता. ही सर्व झाडे महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ, ग्रंथालय परिसरात आणि वर्गखोल्यांच्या सभोवताल लावण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्यांनी दिले . या उपक्रमामुळे विद्यार्थी व शिक्षकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढेल, तसेच महाविद्यालयाची हरित प्रतिमा अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी श्री. किशोर शिंदे यांनी उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले. महाविद्यालयीन कुटुंबाकडून मिळणारे प्रेम, सहकार्य व आदर हीच त्यांच्या कार्याची खरी प्रेरणा असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरणपूरक उपक्रम हे काळाची गरज असल्याने महाविद्यालयात अशा उपक्रमांना पुढेही चालना देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.संपूर्ण कार्यक्रमात कुटुंबवत्सल, आनंददायी व प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते. महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक यांच्या वतीने वतीने श्री. शिंदे यांना उज्ज्वल व आरोग्यपूर्ण आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.