Ticker

6/recent/ticker-posts

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर टोमणे, स्टेटसबाजी आणि भडक संदेशांपासून दूर राहा.-पोलीस निरीक्षक राजेश खेरडे



(प्रतिनिधी) जावेद धन्नू भवानीवाले


मालेगाव: - शहरातील नगरपंचायत, निवडणुक लक्षात घेता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. चौकाचौकात चर्चा, मतमतांतरे आणि सोशल मीडियावर उमेदवारांच्या समर्थकांची चुरस सुरू झाली आहे या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्याने, तिचे काटेकोर पालन होणे अत्यावश्यक आहे. असे मालेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश खेरडे  यांनी सांगितले.
      याबाबत जनतेला स्पष्ट इशारा दिला आहे की, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम किंवा इतर कोणत्याही सोशल मीडियावरून कोणत्याही उमेदवाराबद्दल चिथावणी खोर, टोमणेबाजी किंवा भावनिक ताप वाढवणारे स्टेटस, पोस्ट,रील्स किंवा मेसेज टाळावेत त्यांनी पुढे सांगितले की, काही नागरिक किंवा कार्यकर्ते उत्साहाच्या भरात सोशल मीडियावर पोस्ट टाकतात, पण अशा कृतींमुळे वातावरण बिघडू शकते निवडणुकीचा हा काळ म्हणजे लोकशाहीचा सण आहे त्यामुळे प्रत्येकाने संयम आणि जबाबदारीने वागणे गरजेचे आहे खेरडे यांनी नागरिकांना आवाहन केले की, हिवाळा वाढतोय, पण मनाचं तापमान कमी ठेवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी आवर्जून आव्हान केले आहे.