*वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाचा केला निर्धार*
मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
मालेगाव ता.1- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद मालेगाव तालुका तर्फे आज ता 1 रोजी वृक्षारोपण करून समता परिषदेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी वृक्ष संवर्धनाचा निर्धार व्यक्त करण्यात आला
कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी समता परिषदेचे प्रदेश चिटणीस प्रा अरविंद गाभणे होते यावेळी ते म्हणाले की समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगनराव भुजबळ यांनी 1 नोव्हेंबर 1992 महात्मा फुले समता परिषदेची स्थापना केली होती या समता परिषदेचे माध्यमातून ते ओ बी सी च्यासाठी लढा देत आहेत त्यांना आरक्षण लढ्यात त्यांना साथ देण्याचे आवाहन प्रा गाभणे यांनी केले तसेच वृक्षारोपणा सोबत वृक्ष संवर्धनाकडे पदाधिकारी व समता सैनिकांनी लक्ष द्यावे असे ते म्हणाले
यावेळी समता परिषदेचे तालुका अध्यक्ष अक्षय बळी,जिल्हा कार्यकारिणी सदस्य जावेद भवानीवाले , जिल्हा उपाध्यक्ष सेवाराम आडे,चंद्रकांत गायकवाड, विश्वनाथ चोथमल , राहुल गाभणे, रवी बळी ,विलास बळी , आशुतोष बळी ,संतोष अवचार ,अमर गाभणे शंकर ईरतकर वआदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक व संचालन जावेद भवानिवाले यांनी तर आभार प्रदर्शन अक्षय बळी यांनी केले
.





Social Plugin