Ticker

6/recent/ticker-posts

ऐश्वर्या देशमुख हिची राज्यसेवा परीक्षा २०२४ मधून राजपत्रित संवर्ग पदासाठी निवड

 

 छायाचित्र - पुसेगाव -ऐश्वर्या देशमुख यांचा सत्कार करताना आमदार महेश शिंदे , रणधीर जाधव , योगेश देशमुख , विजय जाधव , प्रदीप देशमुख छाया_ प्रकाश राजेघाटगे बुध 

बुध  दि . [ प्रकाश राजेघाटगे ]  

पुसेगाव येथील हॉटेल व्यावसायिक प्रदीप रामचंद्र देशमुख यांची कन्या ऐश्वर्या देशमुख हिची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षा २०२४ मधून राजपत्रित संवर्ग पदासाठी निवड झाली. ती पुसेगावातील पहिली महिला अधिकारी झाली असून हे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थी वर्गासाठी नक्कीच प्रेरणादायी घटना आहे . तिची पुसेगाव गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली .   कु. ऐश्वर्या हिचे प्राथमिक शिक्षण डॉ. राधाकृष्णन इंग्रजी माध्यम शाळा, पुसेगाव येथे झाले असून इ. ११ व १२ वी तिने महाराजा सयाजीराव कनिष्ठ महाविद्यालय, सातारा येथे पूर्ण करून फलटण येथील कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चरमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षांची तयारी केली होती. ऐश्वर्याच्या या यशाबद्दल  खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले ,आमदार महेश शिंदे , सेवागिरी देवस्थान द्रस्टचे माजी चेअरमन रणधीर जाधव , माजी विश्वस्त योगेश देशमुख , विजय जाधव , पुसेगाव व पंचक्रोशीतील मान्यवर व ग्रामस्थांनी ऐश्वर्या व तिच्या कुटुंबीयांचे अभिनंदन करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.