Ticker

6/recent/ticker-posts

दरवर्षी प्रमाणे हिप्परगा थडी येथे शिवनाम सप्ताहास सुरूवात.

 


बिलोली प्रतिनिधी ~ आमेटवार राजेश 

 हिप्परगा थडी येथील ग्रामदैवत हनुमान मंदिराच्या परिसरात प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षी देखील अखंड शिवनाम सप्ताहाचे ( वर्ष सातवे )आयोजन करण्यात आले. या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत असून, सप्ताहानिमित्ताने शुक्रवारी कळस मांडून देवतांचे प्रतिमेस पुष्पहार टाकून व आरती करून शिवनाम सप्ताहास सुरुवात झाली ,दरम्यान मूर्तीला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.

सप्ताहाच्या अनुषंगाने धार्मिक कार्यक्रमाशिवाय भक्तांकडून विविध रंगीबेरंगी फुलांच्या माळांची सजावट करून सुशोभीकरण करण्यात आले.पंचकळस दि. 21/11/2025 रोज शुक्रवार ष. ब्र. 108 प.पु.शिवानंद शिवाचार्य महाराज तमलुरकर यांच्या हाती मांडण्याचे आयोजिले होते.दिनक्रिया पहाटे 4 ते 6 शिवपाठ, 6 ते 8 रुद्राभिषेक, 8 ते 10 परमरस्य पारायण, सकाळी 10 ते 12 आशिर्वचन, दुपारी 3 ते 4 मन्मथ गाथा भजन, सायंकाळी 5 ते 6 शिवपाठ रिंगण सोहळा, रात्री 9 ते 11 शिवकिर्तन व जागर. दि. 21/11/2025 रोजी किर्तनकार शि.भ.प. विकास भुरे गुरुजी मांजरमकर, दि.22/11/2025 रोजी शि.भ.प. अनिल महाराज शेवाळ,दि. 23/11/2025 ला शि.भ.प. किशोरीताई सोमनाथ चिद्रेवाडीकर, दि.24/11/2025 रोजी शि.प.भ.विश्वनाथ स्वामी पेनुरकर, दि.25/11/2025 रोजी शि.प.भ.धनश्री ताई गंगाधर स्वामी कासराळी, दि.26/11/2025 रोजी शि. शि.भ.प.कैलास महाराज डोंगरगावकर,दि. 27/11/2025 रोजी शि.भ. प.शिवानंद महाराज धापशेटकर दि. 28/11/2025 रोजी महाप्रसाद ठेवण्यात आले.

शिवपाठ प्रमुख व पारायण प्रमुख अशोकराव गुंडफळे शेळगावकर, कपिल मच्छिंद्रनाथ हांद्रे, गायक बस्वराज मंडगीकर, पांडुरंग शंकरराव शिवपुजे, डॉ. कटके साहेब सगरोळीकर, सुरेश शिवपुजे, हार्मोनियम विलास पाटील सगरोळीकर, मृदंग वादक संतोष कुरुडगीकर, ओमकार काळे, आनंदा मोतेवार,चोपदार गंगाराम मामा गोपड शेवाळकर या सर्व सप्ताहयाचे नियोजक महात्मा बसवेश्वर मित्र मंडळ व समस्त गावकरी मंडळी हिप्परगा थडी असून तरी पंचक्रोशातील भाविकांनी या सप्ताहास उपस्थिती राहून धार्मिक कार्याची शोभा वाढवावी असे अध्यक्ष व गावकरी मंडळी म्हटले आहे.