Ticker

6/recent/ticker-posts

अवैध गर्भलिंगनिदान गर्भपात केंद्रांवर छापा दोघे जण पोलीसांच्या ताब्यात एक फरार.






।भोकरदन प्रतिनिधी संजीव पाटील।

 भोकरदन जवळील नांजे वाडी शिवारात गवळी वाडी येथील शेळ्यांच्या गोठ्यात अवैध गर्भपात गर्भलिंगनिदान केंद्र ।
शेळ्यांच्या गोठ्यात अवैध गर्भपात गर्भलिंगनिदान केंद्रावर जालना स्थानिक गुन्हा शाखा आणि आरोग्य पथकांचा छापा . दोन जण पोलीसांच्या ताब्यात एक फरार ॽ

भोकरदन शहरा  पासुन  सहा किलोमीटर अंतरावर नांजे वाडी  शिवारात गवळी वाडी येथील शेळ्यांच्या गोठ्यात अवैध गर्भपात आणि गर्भलिंगनिदान केंद्र सुरु असल्याचे  समजताच जालना स्थानिक गुन्हा शाखा आणि आरोग्य पथकांने बुधवारी सायंकाळी सहा वाजता 26 नोव्हेंबर रोजी छापा टाकला .

.तेजस पॅथालाॅजी चालक  केशव हरी गावंडे, आणि सतीश ‌‌ बाळु सोनवणे , या दोघांविरुद्ध कलम एम पी डी.अक्ट‌अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असुन गोठा मालक समाधान चोरमारे हा फरार झाला आहे.  मशीन आणि काही साहित्य जप्त करण्यात आले आहे.ही कारवाई जालना जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल , अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या  मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखा जालना पोलिस निरीक्षक  पंकज जाधव,साह्यक पोलिस निरीक्षक योगेश उबाळे,सा.पोलीस निरीक्षक खाम गळ, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलिस कर्मचारी विजय डिक्कर,दिपक घुगे, प्रशांतने लोखंडे, इर्शाद पटेल,रमेश राठोड, रमेश काळे,सतीश श्री वास, सोपान क्षीरसागर, गोदावरी सरोदे, सत्यभामा उबाळे, चालक गणपत पवार, जिल्हा सामान्य रुग्णालय डॉ.विजय वाकोडे, रेडिओ लाजीस्ट डॉ.कृष्णा वानखेडे, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय स्नेहल साळवे, डॉ.ज्ञानेश्वर नाताळ, आरोग्य कर्मचारी मनोज जाधव, संजीवन लोखंडे यांच्या पथकाने हा छापा  टाकला.यावेळी गर्भपात साठी वापरले जाणारे किट, काही औषधे गोळ्या जप्त करण्यात आल्या. काही महिला गर्भलिंगनिदान करण्यासाठी आल्या होत्या. त्याचे जबाब नोंदवला जाणार आहेत.