—
सर्जनशील अभिव्यक्तीला मिळाली दणदणीत दाद ...... !
हाता प्रतिनिधी :राजेश दामोदर :
भारतीय संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक कलाकारांनी पारंपरिक रांगोळीच्या माध्यमातून संविधानाचा भव्य अविष्कार उभा केला. रंगांच्या विविध छटा, सूक्ष्म रेषा व आकर्षक कलाकृतीचा सुंदर संगम असलेल्या या रांगोळीने पाहणाऱ्यांना थक्क करून सोडले. संविधानाचा प्रस्तावना, अशोकस्तंभ, तिरंगा तसेच न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचे प्रतीकात्मक स्वरूप यातून प्रभावीपणे साकारले गेले.
ही उठून दिसणारी ही रांगोळी केवळ कलाकृती नव्हे तर भारतीय लोकशाहीचा साक्षात्त प्रतीक वाटत होती. नागरिक, विद्यार्थी व कुटुंबियांनी प्रदर्शनस्थळी मोठी गर्दी करत फोटोसेशनसह या अनोख्या निर्मितीचे कौतुक केले. अनेकांनी सोशल मीडियावर रांगोळीचे फोटो शेअर करून कलाकारांच्या कल्पकतेचा गौरव केला.
संविधान दिनाचे महत्त्व, लोकशाही विचारांची पेरणी आणि सृजनतेला मिळालेला व्यासपीठ हा उपक्रम अधोरेखित करतो. संस्कृतीचा रंग, सृजनतेचा सुगंध आणि देशभक्तीची जाण यांचे सुंदर मिश्रण ठरलेली ही रांगोळी — भारतीय संविधानाचा अभिमान जिवंतपणे अधोरेखित करणारा एक कलात्मक सलामीच ठरली.
असून अकोला जिल्हा कलाध्यापक संघातील कलाशिक्षक श्री मा. संदिप शेवलकर सर संजय आगाशे सुभाष धार्मिक चंद्रकांत वाघ महेन्द्र काकणे संजय गोपनारायण संजय तायडे हेनंत उपरीकर संतोष सहारे चंदन गोपनारायण हनुमंत चव्हाण आनंद फुलारी विवेक फोकमारे यांनी परिश्रम घेतले.तसेच अनेकांच्या योगदानातून कार्यक्रमाचे नियोजन चांगल्या प्रकारे पार पडले.





Social Plugin