भोकरदन प्रतिनिधी। संजीव पाटील।
भोकरदन तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि परत पडलेल्या सतत पावसाने शेतकऱ्यांचे सोने समजले जाणारे कापूस पिकाच्या वाती झाल्या आहेत कपाशीचे पीक पावसाने भिजल्याने काळे पडले असुन बोंडे सडली आहेत खाजगी व्यापारी शेतकऱ्यांची कापुस खरेदी कमी भावाने करीत आहेत. मका पिकास कोंब फुटले असून मका पिकाची 1200 ते 1400 पर्यंत मका खाजगी व्यापारी शेतकऱ्यांची कमी भावाने मका खरेदी करत असुन शासनाने खरेदी केंद्रं त्वरीत सुरु करण्यात यावे.हमी भावाने मका कापूस सोयाबीन ची खरेदी करण्यात यावी . सोयाबीन खरेदी केंद्रं त्वरीत सुरु करण्यात यावे. हमी भावाने सोयाबीन ची खरेदी करण्यात यावी.अगोदरच अतिवृष्टीमुळे आणि सतत प्रयत्न पावसाने शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले असुन मालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. शासनाने रब्बी पिकांच्या पेरणी साठी शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत लवकरात लवकर देण्यात यावी.पिक विमा सर सगट मिळावा . शासनाने कडुन जाहीर केलेली तुटपुंजी रक्कम अद्यापही सुरंगली येथील शेतकऱ्यांनी मिळाली नसुन हजार ते अकरावे खाते दारा पैकी फक्त शंभर खातेदारांना एकरी 1700 रुपये प्रमाणे चे मदत मिळाल्या ची माहिती आहे.तर पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना ही फुटकी कवडी ही अद्याप मिळालेली नाही. शासनाने शेतकऱ्यांनी खाजगी व्यापारी यांना दिवाळी आणि रब्बी पिकांच्या पेरणी साठी
बेभावांनी विक्री केलेल्या सोयाबीन, मका कापूस हमी भावा मधील भाव फरक द्यावा अशी शेतकऱ्यांनी केली आहे.





Social Plugin