Ticker

6/recent/ticker-posts

वाढोणा शिवारात झाडाला गळफास घेऊन दोघांची आत्महत्या



भोकरदन प्रतिनिधी संजीव पाटील

 भोकरदन तालुक्यातील वाढोणा शिवारात डोंगर पायथ्याशी 9 नोव्हेंबर    रविवारी झाडाला गळफास घेऊन लटकत असलेला स्त्री आणि पुरुष मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून . ग्रामस्थांनी घटनेची माहिती पारध पोलीसांना देताच पारध पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत देहाची ओळख पटली असून  सदरील मृत देह हे वालसांवगी येथील  श्रीमती जया बाई पांडुरंग गवळी वय वर्षे 38 ह्या  महीलेचा असुन दुसरा मृतदेह हा वालसांवगी येथील गणेश उत्तम वाघ वय 24 वर्ष यांचा आहे.  
हे दोघे  गुरुवार  पासूनच घरातुन बेपत्ता होते.नातेवाईकांनी शोध घेतला पण पत्ता लागला नाही.हे दोघे जण एकमेकांच्या संपर्कात होते त्यांनी प्रेमातुन आत्महत्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे. दिपक गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पारध पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जायभाये आणि पो.हे.काॅ.सुरेश पाटील अधिक तपास करीत आहेत. जयाबाई गवळी यांना दोन अपत्ये एक मुलगी आणि एक मुलगा असुन हे दोन्ही मूले पोरकी झाली आहे. तर गणेश वाघ हा अविवाहित असुन त्यांने आत्महत्या करुन जिवन संपविल्यामुळे त्यांचे आई वडील पारध पोलिस ठाण्यात शोक व्यक्त करतांना दिसुन आले. जयाबाई आणि गणेश ला लग्न करायचे होते परंतु घरच्यांचा प्रखर विरोध होता अशी चर्चा आहे. या घटनेने नागरीक हळहळ व्यक्त करीत आहेत तर काही ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.