हदगाव प्रतिनिधी महाराष्ट्र ग्रामीण न्युज, देवानंद महाजन
पोलीस उपनिरीक्षक दत्तराव वाणी यांचे सुपुत्र विकास वाणी यांची नियुक्ती जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव अंतर्गत तुळजाभवानी संस्थान येथे वरिष्ठ लिपिक या पदी निवड झाल्याबद्दल सर्व समाज बांधवांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सहकुटुंब सत्कार केला. या सत्काराच्या वेळी नथुजी भोसले, तुकाराम गव्हाणे, पांडुरंग नवघरे, प्रभाकर तपासे, वेंकट सूर्यवंशी, चांदराव भोसले, अंश सुदाम हटकर, धोंडीबा धनगरे गोविंदराव गव्हाणे, संजय भोसले, विनोद गव्हाणे, बाळकृष्ण हटकर, महाजन, प्रभाकर साबळे, शेषराव मोरे, सुदाम हटकर, व ऋषिकेश जगताप सर्व समाज बांधवांनी आपल्या वेळातील वेळ काढून सत्कार सोहळ्यास उपस्थित राहून विकास वाणी यांचा सहकुटुंब सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. तसेच पोलीस उपनिरीक्षक वाणी यांनी सर्व उपस्थित समाज बांधवांचे धन्यवाद मानले.





Social Plugin