*सचिन खरात व खुर्शीद जिलाणी यांच्या जनसंपर्काला उसळलेला प्रचंड जनसमर्थनाचा लोंढा; जनतेत स्पष्ट सूर: 'विकास हवा तर सचिन खरात हवा'*
अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके
अंबड: शहरातील प्रभाग क्र. ६ मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाने (रासप) नगरसेवक पदासाठी सचिन खरात आणि खुर्शीद जिलाणी यांना उमेदवारी देताच येथील राजकीय वातावरणात मोठी उलथापालथ झाली आहे. अर्ज दाखल झाल्यापासूनच या दोघांच्या नावाभोवती उत्सुकतेचे वर्तुळ तयार झाले होते आणि आता जनसंपर्क सुरू होताच सामान्य नागरिकांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, ही निवडणूक प्रभाग ६ मधील राजकीय समीकरणे निर्णायकपणे बदलणारी ठरणार, अशी चर्चा सध्या जोरात सुरू आहे.
सर्व समाजात घट्ट नाळ: 'आपलेच माणूस' म्हणून ओळख
सचिन खरात आणि खुर्शीद जिलाणी हे दोघेही प्रभागातील सर्व समाज बांधवांमध्ये सहजपणे मिसळणारे आणि लोकांच्या सुख-दुःखात धावून जाणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. गोर-गरीबांच्या अडचणीत धावून जाणे, कोणत्याही प्रसंगी मदतीसाठी रात्री-अपरात्री उपलब्ध राहणे आणि समाजात कोणताही भेदभाव न करता सर्वांसोबत असणारी त्यांची लोकाभिमुख शैली नागरिकांना विशेष भावली आहे.
घराघरांत भेटीदरम्यान मिळणारा अतुट विश्वास तरुण मतदारांचा वाढता कल
महिला मतदारांचा मोठा पाठिंबा
यामुळे विरोधकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, 'नेता नाही, तर आपला माणूस' अशी त्यांची प्रतिमा आज प्रभागात ठामपणे उभी राहिली आहे. विकासाचा ठोस अजेंडा आणि दमदार कामगिरीची छाप
प्रभाग ६ मधील पायाभूत सुविधा, वीज-लाईट समस्या, स्वच्छता, रस्त्यांची दुरुस्ती, पाणीपुरवठा यांसारखे अनेक मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी सचिन खरात आणि खुर्शीद जिलाणी यांनी केवळ निवडणुकीपुरते नव्हे, तर सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. केवळ राजकारण न करता कार्यक्षम आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे.
विशेषत: तरुणांसाठी रोजगार उपक्रम राबवून त्यांनी प्रभागातील तरुणांचे प्रश्न समजून घेतले आहेत. त्यांच्या हाताला काम मिळावे यासाठी रोजगारक्षम उपक्रम, मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष संधी उपलब्ध करून देण्यात हे दोन्ही नेते नेहमी पुढे असतात. त्यामुळे तरुण वर्गात त्यांची मजबूत पकड निर्माण झाली आहे. जनसंपर्कात उडालेला 'धुरळा': निवडणूक रंगात
सध्या प्रभाग ६ मध्ये सचिन खरात आणि खुर्शीद जिलाणी यांच्या प्रचाराचा जोर प्रचंड वाढला आहे. गल्ली-बोळांत नागरिकांचा उत्साह, भेटीत मिळणारा आशीर्वाद आणि चौकात होणाऱ्या चर्चेत उमटणारा एकच सूर आहे: "विकास हवा तर सचिन खरात हवा आणि लोकांसाठी नेहमी उपलब्ध असणारा नेता हवा!"
या सकारात्मक लाटेमुळे प्रभागातील राजकीय वातावरण तापले असून, निवडणूक कमालीची रंगतदार बनली आहे. या दोन 'दमदार' उमेदवारांच्या प्रवेशाने यंदा चुरस तुफान वाढली असून, विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याकडे संपूर्ण अंबड शहराचे लक्ष लागून राहिले आहे.





Social Plugin