Ticker

6/recent/ticker-posts

जाधव परिवाराचा सेवाभावी उपक्रम: स्मृतिदिनानिमित्त वृद्धाश्रमात अन्नदान.



 कळंबसर, ता. नेकनूर, 

छत्रपती शिवाजी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक कै. निळकंठ जाधव यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त गऊबाई महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था (वृद्ध हीच ईश्वर सेवा), कळंबसर-नेकनूर संचालित वृद्धाश्रमात अन्नदान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या निमित्ताने कै. जाधव यांचे पुत्र प्रा. डॉ. निखिल निळकंठ जाधव यांनी आपल्या परिवारासह वृद्धाश्रमातील रहिवाशांना एकवेळचे भोजन देऊन त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली. या सेवाभावी उपक्रमात त्यांच्या मातोश्री संगीता जाधव यांचीही मोलाची साथ लाभली.

कै. निळकंठ जाधव यांनी आयुष्यभर जपलेल्या शैक्षणिक परंपरेचे मूल्य, विचारसरणीचे संस्कार आणि सामाजिक बांधिलकीचे तत्वज्ञान जनमानसात पोहोचवण्याचे कार्य त्यांचे कुटुंब सातत्याने करत आहे. स्मृतिदिनानिमित्त पार पडलेल्या या अन्नदान सेवेमुळे त्यांच्या आदर्श कार्याची पुन्हा जाणिव दृढ झाली.