जालना जिल्हा परिषदेत २०२४-२५ आर्थिक वर्षात आतापर्यंत ५६ कोटींहून अधिक निधी गेला परतआ. बबनराव लोणीकर यांनी CEO ना भेटून चिंता केली व्यक्त अधिकाऱ्यांना धरले धारेवर नागपुरात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी द्वारे सरकारचे वेधणार लक्ष - आ. बबनराव लोणीकर
प्रतिनिधी:- लक्ष्मण बिल्हारे
जालना जिल्हा परिषदेने चालू आर्थिक वर्षात (२०२४-२५) नोव्हेंबरअखेरपर्यंत ५६ कोटी ०५ लाख रुपयांचा निधी खर्च करू न शकल्याने तो परत गेला आहे. मागील तीन वर्षांतही सरासरी १८ ते २४ कोटी रुपये परत गेले होते. अशा प्रकारे गेल्या साडेचार वर्षांत एकूण ११८ कोटी ५४ लाख रुपयांचा निधी परत गेल्याची माहिती समोर आली आहे.
आज सायंकाळी परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. पी. एम. मिन्नू यांची त्यांच्या दालनात प्रत्यक्ष भेट घेऊन निधी परताव्याबाबत चिंता व्यक्त केली आणि वेळेत खर्च न झाल्याने नाराजी व्यक्त केली.





Social Plugin