बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
श्री नागनाथ माध्य व उच्च माध्यामिक विद्यामंदिर बुध मध्ये 26 नोंव्हेबर संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .विद्यालयाचे प्राचार्य श्री अंकुश भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान दिनानिमित्त विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहाने संविधान साजरा करण्यात आला . यावेळी विद्यालयातील विद्यार्थीयांच्या हस्ते भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधान यांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले .यावेळी ज्येष्ठ शिक्षक तानाजी पाटील यांनी भारतीय संविधान आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची सामाजिक शैक्षणिक व राजकीय या संदर्भात मार्गदर्शन केले .स्वातंत्र्य समता व बंधुत्व हे मूल्य भारतीय राज्यघटनेने आपणाला दिलेले अधिकार याची जाणीव घटनेच्या माध्यमातून होते असे मनोगतातून व्यक्त केले .भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत करण्यात आले .त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी झाली .विद्यालयातील सर्व प्राध्यापक ,शिक्षक . शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी संविधानाचे पुजन व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले .तसेच अंकुश भांगरे यांनी देखील विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व सांगितले .संजय माने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर नामदेव धनवडे यांनी आभार मानले .





Social Plugin