बुध   दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

  श्री सेवागिरी महाराजांच्या७८ व्या पुण्यस्मरणानिमित्त शुक्रवार, दि. २८ ते ५ डिसेंबर या कालावधीत येथील मंदिरात गुरुचरित्र व श्री सेवागिरी विजयामृत ग्रंथाचे पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह होणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज आणि ट्रस्ट चेअरमन संतोष वाघ यांनी दिली.

या सप्ताहात पहाटे ४ ते ६ वाजता काकड आरती, ८ ते ११ गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण, दुपारी ३ ते ५ श्री सेवागिरी विजयामृत ग्रंथाचे वाचन होणार आहे. सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, ७ ते ९ कीर्तन त्यानंतर महाप्रसाद आणि जागर होणार आहे. दि. २ ८ रोजी राजाराम महाराज काटे श्री क्षेत्र देहू, दि. २९ रोजी मयुर महाराज बोडके ओझर   , दि. ३० गणेश  महाराज साजुर , दि. १ रोजी संजय महाराज साळुंखे निगडी  , दि २ बाळकृष्ण महाराज दळवी श्रीगोंदा, दि. ३ भाऊसाहेब महराज पवार कडेगाव , दि. ४ रोजी संजय महाराज वेळूकर , तर दि. ५ रोजी सकाळी ९ ते ११ या काळात तुकाराम महाराज मुळीक आळंदी यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.

गुरूवार, दि ४ रोजी दुपारी ४ ते ६ या वेळेत गावातून दिंडी सोहळा पार पडणार आहे. या ग्रंथवाचन आणि हरिनाम सप्ताहाचा लाभ सर्व भाविक-भक्त आणि ग्रामस्थांनी घ्यावा, असे आवाहन विश्वस्त  डॉ . सुरेश रणधीर जाधव, संतोष जाधव , सचिन देशमुख, गौरव जाधव यांनी केले आहे.