Ticker

6/recent/ticker-posts

चेनापूर येते क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.



प्रतिनिधी/विश्वराज वाकोडे

            अर्धापूर तालुक्यातील चेनापुर येथे क्रांतीसुर्य महामानव भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. क्रांति सूर्य बिरसा मुंडा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

त्यानंतर ध्वजारोहण मा. सरपंच तथा ग्राप सदस्य गणेश राव राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्य क्रमासाठी गावातील गावकरी मंडळी, प्रतिष्ठित नागरिक सरपंच व प्रतिनिधी उत्तम माहागाडे उपसरपंच दिलीप लोणे,तं.मु. अध्यक्ष बालाजी राठोड,पो.पा. अंबादास होलगिरे,भीमजयंती मंडळाचे अध्यक्ष भीम राव लोणे बबनराव नवघडे,शा.व्य.स. अध्यक्ष सुरेश जंगीलवाड तसेच जयंती मंडळ अध्यक्ष भिमराव खूपसे,सदस्य रावसाहेब गायकवाड,शेषेराव मारकड, रंगराव भिसे, गणपत मेंडके,प्रा शंकर मारकड,संजय होलगिर, क्रांती मित्र मंडळ सदस्य देविदास ताडेराव, ज्ञानेश्वर 

मुरमुरे व सर्व समाज बांधव उपस्थित होते. यावेळी क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर प्रा.शंकर मारकड यांनी प्रकाश टाकला व समाज बांधवांना मार्गर्शन केले. त्यांनी महामानव यांना आपण समजून घेवून त्यांच्या जीवन कार्याचा सखोल अभ्यास करून समाज जागृत करावा यासाठी नवतरुण युवकांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले.