यावल तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतपेढीच्या कार्यकारी मंडळाचा सर्वानुमते निर्णय
(प्रतिनिधी : आरिफ खान)
यावल तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतरांची सहकारी पतपेढी मर्या., यावलच्या तज्ज्ञ संचालकपदी अंजुमन उर्दू हायस्कूल, साकळी येथील मोहम्मद असलम मोहम्मद ताहेर शेख यांची शनिवार, दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी सर्वानुमते निवड करण्यात आली.
पतपेढीच्या कार्यकारी मंडळाच्या मासिक सभेत याबाबत निर्णय घेण्यात आला. ऑगस्ट २०२६ ते जुलै २०२७ या कालावधीसाठी त्यांची तज्ज्ञ संचालक म्हणून निवड करण्यात आली असून, निवडीनंतर पतपेढीच्या वतीने त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
मोहम्मद असलम ताहेर शेख यांच्या निवडीबद्दल पतपेढीचे अध्यक्ष किरण वासुदेव झांबरे, उपाध्यक्ष अतिश शामराव मेघे, चिटणीस सतीश सरोदे, खजिनदार राजू चौधरी तसेच सर्व संचालक मंडळाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
तसेच सर सैय्यद एज्युकेशन सोसायटी, साकळीचे अध्यक्ष हाजी सत्तार खान, उपाध्यक्ष सैय्यद अहमद व इस्माईल खान, चेअरमन हाजी निसार खान, सचिव के. बी. खान तसेच अंजुमन उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक मोहम्मद फारूक यांनी मोहम्मद असलम ताहेर शेख यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
शाळेतील सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गातूनही त्यांच्या निवडीचे स्वागत करून अभिनंदन करण्यात आले. मोहम्मद असलम ताहेर शेख यांच्या निवडीमुळे अंजुमन उर्दू हायस्कूल, साकळीच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.





Social Plugin