स्वच्छ–सुंदर–हरित अंबड शहर बनवणार !स्वच्छ प्रतिमा अभ्यास वृत्ती आणि वास्तव जाणणारे नेतृत्व म्हणजेच सौ.देवयानीताई केदार कुलकर्णी
अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
अंबड नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या रणांगणात महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या लोकप्रिय उमेदवार सौ.देवयानीताई केदार कुलकर्णी यांनी आपल्या दमदार आणि दूरदर्शी नेतृत्वाची ठसठशीत छाप उमटवली आहे.विकासाचा भक्कम व्हिजन डॉक्युमेंट जाहीर करून त्यांनी केवळ प्रचाराची दिशा बदलली नाही तर मतदारांच्या मनात विश्वासाचा व विकासाचा तेजोमेघ निर्माण केला आहे.स्वच्छ-सुंदर-हरित अंबड हा त्यांचा संकल्प आता अंबडकरांच्या हृदयात घणाघाती स्वरात घुमताना दिसतो आहे.
*पाणीप्रश्नावर मोठा ब्रेकथ्रू १३३ कोटींचा मास्टर स्ट्रोक*
अंबडच्या सर्वात जिव्हाळ्याच्या पाणीप्रश्नावर आमदार नारायण कुचे यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत अंबडसाठी १.३३ कोटी रुपयांची जायकवाडी ते अंबड स्वतंत्र पाईपलाईनसाठी योजना मंजूर करून आणण्याचा ऐतिहासिक विक्रम रचला आहे.हे काम लवकरच युद्धपातळीवर सुरू होणार असून अंबडकरांना कायमस्वरूपी पाण्याची समस्या मागे टाकता येणार आहे.
तसेच नवीन जलस्रोत,गळक्या जुन्या लाईन्सचे नूतनीकरण व आधुनिक वितरण व्यवस्था या सर्वांची अंमलबजावणी तातडीने होणार आहे.कचरामुक्त- स्वच्छ स्मार्ट अंबड शहरातील अस्वच्छतेचा विद्रूप चेहरा बदलण्यासाठी देवयानीताईंनी युद्धपातळीवरील अभियान हाती घेतले आहे.घराघरातून नियमित कचरा संकलन आधुनिक व वैज्ञानिक कचरा व्यवस्थापन नालेसफाईचा विशेष मोहीम यामुळे अंबड स्मार्ट सिटीच्या तोडीचे बनवण्याचे त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे.
नाईट-व्ह्यू होणार उजळून शहरातील अंधारे कोपरे होणार प्रकाशमान शहरातील प्रमुख चौक व रस्त्यांवर आकर्षक आणि शक्तिशाली स्ट्रीटलाईट्स बसवून अंबडचे नाइट-स्कायलाइन पूर्णपणे बदलणार आहे.अंधार संपेल-सुरक्षितता वाढेल शहर नवीन रूपात नटणार महिला सुरक्षेला प्राधान्य संपूर्ण शहर हायटेक CCTV कव्हरेज माता-भगिनींच्या सुरक्षेसाठी संपूर्ण शहरात CCTV नेटवर्क उभारण्याचा निर्णय देवयानीताईंनी जाहीर केला आहे.त्यासोबतच महिलांसाठी स्वच्छ,सुरक्षित व स्वतंत्र स्वच्छतागृहे उपलब्ध केली जाणार आहेत.
यामुळे शहरातील गुन्हेगारीवर मोठा आळा बसेल,असा विश्वास व्यक्त केला आहे.आबालवृद्धांसाठी आनंदाची सैर काँक्रीटच्या जंगलात माणुसकीची सोनेरी छटा निर्माण करण्याचा देवयानीताईंचा निर्धार उल्लेखनीय आहे.मुलांसाठी सुरक्षित व आधुनिक प्लेग्राऊंड्स ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना-नानी पार्क तरुणांसाठी वॉकिंग ट्रॅक आणि ओपन जिम अंबडचा प्रत्येक नागरिक त्यात सामावलेला- हा त्यांचा दृष्टीकोनच लोकांना भुरळ घालतो आहे.
रस्ते-ड्रेनेज-वाहतूक वर्षानुवर्षे रखडलेले प्रश्न आता मार्गी नियोजनबद्ध पद्धतीने शहरातील रस्ते,ड्रेनेज लाईन्स आणि वाहतूक कोंडीचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या सज्ज आहेत.माझे अंबड शहर स्वच्छ-सुंदर करण्यासाठी मी रक्ताचे पाणी करेन त्यांचे हे उद्गार मतदारांच्या काळजाला भिडले आहेत.
*जनतेचा प्रचंड ओढा प्रचारसभांना विक्रमी गर्दी*
महिला नेतृत्व पारदर्शक कारभार आणि विकासाचे स्पष्ट ब्लूप्रिंट यामुळे देवयानीताईंच्या सभांना लोकांची अभूतपूर्व गर्दी होत आहे.ज्येष्ठ नागरिकांपासून युवकांपर्यंत सर्वच वर्गातून त्यांना मिळणारा प्रतिसाद प्रचंड आहे.अंबडच्या नशिबाची पालक पलटणार नागरिकांचा विश्वास वाढत चालला आहे.
“स्वच्छ प्रतिमा,अभ्यासू वृत्ती आणि वास्तव जाणणारे नेतृत्व म्हणजे सौ.देवयानीताई केदार कुलकर्णी !”
.jpg)




Social Plugin