मन्सूर शहा. धोत्रा. भंनगोजी:----
चिखली - आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी स्थानिक तक्षशिला माध्य.व उच्च माध्य. विद्यालय चिखली येथे स्त्री शिक्षण, समानता,व सत्यासाठी आपले देह झिजवणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.अवचार सर तर प्रमुख पाहुणे श्री.पवार सर आणि कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून प्रा. डी. एल.जाधव सर यांची उपस्थिती होती. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनपटावर सर्वप्रथम प्राचार्य लहाने सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थांनी भाषणे सादर केली.आणि शिक्षकांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमात सहभाग नोंदविणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजनार्थ बक्षीस देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु.साळवे आणि आभार प्रदर्शन कु. देशमुख यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता प्रा. नागरे सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी विशेष सहकार्य केले.





Social Plugin