बुध दि [प्रकाश राजेघाटगे ]
सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी शिवसेना- भिमसेना एकत्रितरित्या काम करत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने फुले- शाहू - आंबेडकरांच्या विचाराचे बिजारोपण झाले आहे. त्याचे प्रतीक म्हणून रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र नेते श्री रमेश अनिल उबाळे यांनी उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची छोटीशी मूर्ती भेट देऊन त्यांना संविधानाची आठवण करून देण्यात आली. सदर मूर्ती सन्मानपूर्वक स्वीकारून शिवशक्ती व भीमशक्ती ही परिवर्तनाची शक्ती आहे. असे गौरव उद्गागार काढले.
या वेळेला रिपब्लिकन सरसेनाप्रमुख आनंदराज आंबेडकर, युवा नेते ऍड. अमर आंबेडकर , राष्ट्रीय महासचिव संजीव बावधनकर , राज्य महासचिव विनोद काळे, मुंबई प्रदेश उपाध्यक्ष अमोल रोकडे सातारा जिल्हा अध्यक्ष विशाल भोसले, सचिव नितीन भाऊ रोकडे यांच्यासह सातारा जिल्ह्यातील सुमारे पाचशे कार्यकर्ते या रिपब्लिक सेनेच्या मेळाव्याला उपस्थित होते.
सातारची भूमी क्रांतिकारक असल्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत मजर मारणारे सातारकर आहेत .आज सर्व क्षेत्रांमध्ये नावलौकिक प्राप्त करत आहेत. साताऱ्यात रिपब्लिकन सेना मोठ्या संख्येने सामाजिक कामात अग्रेसर असल्याने कोणतीही मदत लागली तर सातारकर म्हणून मी सदैव उभा राहीन .
शिवसैनिक व भीमसैनिक संपर्कात राहून सर्व समाजाची कामे घेऊन या आपण न्याय देवू .असे त्यांनी स्पष्ट केले लवकरच सातारा जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेचा एक भव्य मेळावा आयोजित करून शिवशक्ती भीमशक्ती संपूर्ण राज्यात वैचारिक रित्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मानसन्मानाने काम करेल . असेही त्यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यातील दरे तांब तालुका महाबळेश्वर येथील शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे गावचे सुपुत्र रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्राचे नेते श्री रमेश अनिल उबाळे यांनी डॉक्टर आंबेडकरांची मूर्ती पाहून शिवशक्ती भीमशक्तीच्या कार्याची प्रेरणा मिळते असे ठणकावून सांगितले. त्यावेळी टाळ्यांचा कडकडाट झाला.





Social Plugin