मारोती एडकेवार हिप्पारगा थडी /प्रतिनिधी
हिप्पारगा थडी : मानव जीवनासाठी धर्म महत्त्वाचा असून त्याचे,आचरण करणे व प्रचार करणे, व प्रसार करणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य असून,हा उद्देश मनाशी धरून दरवर्षीप्रमाणे हिप्परगा थडी येथे अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले, आहे सप्ताह प्रारंभ 21 /11/ 2025 रोजी, डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या आशीर्वादाने, पंचकळस श्री परमपूज्य 108 शिवानंद शिवाचार्य महाराज तमलूरकर यांच्या हस्ते, प्रारंभ झाला तरी पंचक्रोशीतील, सर्व शिवभक्तांना कळविण्यात आनंद होतो, की आपण या सप्ताह मध्ये उपस्थिती राहून ज्ञानवंत, विचारवंतांचे विचार आपल्या जीवनात घेऊन आपला, जीवन आयुष्य ज्ञानवंत व किर्तीवंत करून घ्यावे, अखंड शिवनाम सप्ताहाची सांगता दिनांक 28/ 11 /2025 रोजी महाप्रसादाच्या कार्यक्रमाने संपन्न होईल, तरी अखंड शिवनाम सप्ताह मध्ये उपस्थिती राहून, सप्त्याची शोभा वाढवावी ही विनंती, व आयोजक व्यवस्थापक महात्मा बसवेश्वर मित्र मंडळ व समस्त गावकरी हिप्पारगा थडी.





Social Plugin