Ticker

6/recent/ticker-posts

महाग्रामीण प्रिमियर लीगचा अमरावतीत थाटात समारोप .





ग्रामीण प्रतिनिधी-महमदरफी मदार आदमपूरकर 

महाराष्ट्र ग्रामीण बँक कर्मचारीवर्गांसाठीच्या दरवर्षी स्पर्धेप्रमाणे यंदाही महाग्रामीण प्रिमियर लीगचे अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ स्टेडियम परिसरात दि.२१,२२ व २३ नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. महाराष्ट्र ग्रामीण बँक विभागीय कार्यालय अकोला यांनी सदरील स्पर्धेचे आयोजन केलेले होते.क्रिकेट,बॅडमिंटन, पिकलबाॅल,कॅरम,बुद्धिबळ आदि खेळ समाविष्ट करण्यात आले होते.

सदरील स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी छञपती पुरस्कार प्राप्त दिलीप बाबू इंगोले,अमरावती जिल्हाधिकारी आशिष येरेकर,पोलीस अधीक्षक ग्रामीण विशाल आनंद,सचिव माधुरी चेंडके, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अध्यक्ष मिलिंद घारड, सुनील कोचेटा, बँक ऑफ महाराष्ट्र विभागीय व्यवस्थापक महेश डांगे, महेंद्र काबरा,प्रशांत कुलकर्णी, उत्कर्ष संगवे,मजुमदार आदि पदाधिकारी उपस्थित होते.

क्रिकेट खेळातून सर्वसाधारण विजेतेपद बीड विभागाने तर उपविजेतेपद परभणी विभागाने पटकावले.बॅडमिंटन पुरूष विजेते प्रितम गिरीगोसावी,महिला विजेती मधुरा सुपेकर,बॅडमिंटन,कॅरम उपविजेते गोविंद हिवराळे,अब्दुल वाजिद,कॅरम सांघिक विजेती प्रगती भुजाडे,कल्याणी दाचेवार,बॅडमिंटन उपवविजेती दाचेवार,बुद्धिबळ उपविजेते विनोद शेंडे व इतरही कर्मचारीवर्ग खेळाडूंनी बक्षीसांची  लयलूट केली.स्पर्धेत हेड ऑफिस हंटर, परभणी पँथर,बीड ब्लास्टर्स, पुणेरी पलटन,सोलापूर स्पार्टन्स, रत्नागिरी राॅयल, चंद्रपूर चॅम्पियन्स,भंडारा ब्रेव्हहर्ट्स,नांदेड नाईटहाॅक्स,नाशिक नाईट रायडर्स, यवतमाळ योद्धा,अकोला अव्हेन्जर्स,लातूर लिजेंड्स, छञपती संभाजीनगर स्ट्रायकर्स आदि कर्मचारी  खेळाडू संघ विभाग सहभागी होते.