Ticker

6/recent/ticker-posts

दुधगावातील रस्ते अंधारात; महिनाभरापासून बल्ब बदलण्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष.



दुधगांव- 

दीपावलीपासून गावातील काही प्रमुख भागांतील रस्त्यांवरील विद्युत खांबांवरील बल्ब गेले असून, रात्रीच्या वेळी रस्ते व गल्ली–बोळ पूर्ण अंधारात बुडत आहेत. याबाबतीत ग्रामपंचायत आणि महावितरण कर्मचाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही बल्ब बदलण्यात आलेले नाहीत, यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. महिनाभरापासून अनेकदा सांगून पण सरपंच, उपसरपंच व ग्रा.पं सदस्य यांनी अद्याप यावर काहीच केले नाही. फक्त आज उद्या अशी उत्तरे देत आहेत.

अंधारामुळे रात्री नागरिकांना ये–जा करताना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. विशेषतः महिला, शाळकरी मुलं आणि वयोवृद्ध यांची गैरसोय अधिक वाढली आहे.स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत म्हटले,“महिनाभर झाले बल्ब गेलेत, पण ग्रामपंचायतीकडून काहीच हालचाल नाही. नक्की प्रशासन करते तरी काय?” असा थेट सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.गावातील सुरक्षिततेसाठी रस्त्यांवरील प्रकाशयोजना तातडीने दुरुस्त करून बल्ब बदलण्याचे काम पुढील 24 तासांत सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.“अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने बल्ब बदलू,” असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.