कैलास कोल्हे @ग्रामीण प्रतिनिधी
जालना: लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या आनंदो प्लस उपक्रमाच्या माध्यमातून जलना विभागात बेसिक कॉम्प्युटर कोर्स बॅचला उत्साहपूर्ण सुरुवात झाली आहे. बदनापूर केंद्रात १७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५ विद्यार्थ्यांसह तर भटपुरी केंद्रात १८ नोव्हेंबर २०२५ रोजी १० विद्यार्थ्यांसह या कोर्सचा प्रारंभ करण्यात आला . दोन्ही केंद्रांमधून एकूण २५ विद्यार्थ्यांनी या डिजिटल सक्षमीकरण उपक्रमासाठी नावनोंदणी केली आहे.
कार्यक्रमाच्या सुयोग्य अंमलबजावणीसाठी सर्व विद्यार्थ्यांची बेसलाईन मूल्यांकन चाचणी पूर्ण करण्यात आली असून अद्ययावत अभ्यासक्रम संबंधित संगणक प्रशिक्षण संस्थांना देण्यात आला आहे. अभ्यासक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विषयक घटकांचा समावेश करून विद्यार्थ्यांना तांत्रिकदृष्ट्या समृद्ध शिक्षण देण्याचा हेतू ठेवण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसोबत तसेच संगणक संस्थेसोबत सर्व आवश्यक कागदपत्री प्रक्रिया आणि मार्गदर्शनात्मक चर्चा पूर्ण केल्यामुळे या कोर्सचे आयोजन निर्विघ्न, सुसंगत व प्रभावी होणार आहे, अशी माहिती प्राप्त झाली.
या उपक्रमासाठी सहायक समन्वयक जगदीश सातपुते यांनी विशेष मेहनत व प्रयत्न घेऊन सर्व प्रक्रियेचे नियोजन व समन्वय यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे व्यवस्थापनाच्या वतीने सांगण्यात आले. या कोर्समुळे विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल कौशल्य विकासाला चालना मिळून भविष्यातील करिअरविषयक संधींना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.





Social Plugin