*श्री कृष्णा नेत्रालय आणि पसायदान संस्थेच्या संयुक्त विद्यमाने भव्य शिबिर, ३० जणांना चष्मा वाटप*
अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके
अंबड :तालुक्यातील मौजे काटखेडा, रमाई नगर, ता. अंबड, जि. जालना येथील नागरिकांसाठी नुकतेच श्री कृष्णा नेत्रालय व किफायत ऑप्टिकल आय क्लिनिक, छत्रपती संभाजी नगर, आणि पसायदान बहुद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने एका भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, ज्यात ७५ हून अधिक लाभार्थ्यांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली.
डोळ्यांच्या विविध समस्यांवर तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी व मार्गदर्शन केले. या तपासणीनंतर गरजू असलेल्या ३० लाभार्थ्यांना मोफत चष्मा (ग्लासेस) तसेच डोळ्यांसाठी आवश्यक ड्रॉप्सचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी (मायमाऊली) अत्यंत उपयुक्त ठरला, ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान स्पष्टपणे दिसून आले.
गावातील नागरिकांनी शिबिराच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेत सहकार्य केल्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला.
यावेळी उपस्थित मान्यवर:
शिबिराच्या यशस्वीतेसाठी पसायदान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राम खाडे, अभिमन्यू जऱ्हाड, जगदीश तात्या जऱ्हाड, सरपंच रमेश दादा जऱ्हाड, सुरेशराव खाडे, बद्रि नाना जऱ्हाड, रविभाऊ लिहिणार, नवनिर्वाचित पोलिस पाटील धनंजय लिहिणार, विठ्ठल मुंढे, रघुभाई इंचाळ, प्रकाश साळवे यांच्यासह डॉ. अरुणा पवार मॅडम, सविता शिरसाठ मॅडम आणि परिसरातील अन्य प्रतिष्ठित नागरिक, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.jpg)




Social Plugin