Ticker

6/recent/ticker-posts

"तलावांमध्ये मासेमारीचा हक्क केवट समाजालाच — शिवसेना नेते गजेंद्र देशमुख.



पारंपारिक मत्स्य व्यवसाय, करणाऱ्या केवट(तागवाली) आदिवासींना जवळच्या विविध तलावांमध्ये मासेमारी करण्याची परवानगी द्या--शिवसेना नेते गजेंद्र देशमुख यांची मागणी 

  सिंदखेडराजा प्रतिनिधी / ज्ञानेश्वर तिकटे

 सिंदखेडराजा -  मातृतिर्थ सिंदखेडराजा तालुका तथा मतदारसंघा मध्ये पारंपारिक मत्स्य व्यवसायावर उदरनिर्वाह करणारा केवट (तागवाली) हा आदिवासी प्रवर्गात असणारा समाज मोठ्या प्रमाणावर असून शैक्षणिक अभाव, अपुरे ज्ञान, गरिबीची परिस्थिती व बिगर मासेमारी प्रवर्गात येणाऱ्या लोकांकडून दिशाभूल झाल्याने आज पावेतो हा समाज, मोठ्या प्रमाणावर मासेमारी व्यवसायापासून वंचित राहिलेला आहे त्यामुळे त्यांना जवळपासचे तलाव, व धरणे यामध्ये मासेमारी करण्याची परवानगी देण्यात यावी, किंवा मासेमारी संस्थेत समाविष्ट करून घेण्यात यावे अशी मागणी शिवसेना नेते गजेंद्र देशमुख यांनी मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांच्या माध्यमातून केली आहे 

निवेदनात पुढे म्हटले आहे की मूळचा पारंपारिक असणारा केवट, तागवाली आदिवासी हा समाज मूळच्या शेत जमिनी किंवा स्थावर मालमत्ता नसल्याने बहुतेक काळ जंगलातच राहिलेला आहे तसेच त्यांचे मुख्य उदरनिर्वाहाचे साधन हे मासेमारी असताना सुद्धा त्यांना आतापर्यंत यापासून वंचित रहावे लागलेले आहे 

मातृतीर्थ सिंदखेड राजा मतदार संघामध्ये खडकपूर्णा प्रकल्प, मांडवा ,धानोरा  केशवशिवणी तलाव तसेच अंढेरा, मेरा परिसरातील धरणे व तलावातून मंजूर कार्यक्षेत्रापेक्षाही अधिक प्रमाणात काही विशिष्ट संस्थांची मक्तेदारी असल्यामुळे केवट तागवली समाजाला या पासून वंचित रहावे  लागले आहे त्यामुळे आजही अनेकांची उपासमार व अडचण आहे जेव्हा की नदी नाले धरणे व मोठ्या पाणी प्रवाहात त्यांना मासेमारी कौशल्य पुर्ण पणे करता येते तेव्हा वर नमूद केल्या गेलेली नदीपात्रे तलाव व धरणांमध्ये शासकीय नियमांची पूर्तता करत केवळ तागवाली समूहास नव्याने मासेमारी संस्था देऊन किंवा अगोदरच्या संस्थांमध्ये समाविष्ट करून रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा तसेच मांडवा धरणातील क्षतीग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा मासेमारीची परवानगी देण्यात यावी किंवा त्यांना मासेमारी संस्था देऊन, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात याव्यात तसेच खडकपूर्णा नदीपात्रामध्ये जिथे हराशी झालेली नाही त्या ठिकाणी मासे मारीची परवानगी देण्यात यावी यावर युद्ध पातळीवर शासनाकडून निर्णय व्हावा अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे  

लवकरच मत्स्य व्यवसाय मंत्र्यांना एका शिष्टमंडळाद्वारे भेटून ही बाब प्रत्यक्ष निदर्शनास आणणार असल्याचे सुद्धा गजेंद्र देशमुख यांनी सांगितलेसदर निवेदनाच्या प्रती माननीय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब, केंद्रीय मंत्री नामदार प्रतापरावजी जाधव साहेब तथा पाटबंधारे व जलसंपदा मंत्री माननीय नामदार गिरीश जी महाजन साहेब यांना पाठविण्यात आल्याची कळते.