Ticker

6/recent/ticker-posts

सिंदखेड राजा तालुक्यात eKYC पूर्ण करण्याचे तहसीलदार अजित दिवटे यांचे आवाहन



*अतिवृष्टी अनुदानासाठी विशेष शिबीर!* 

सिंदखेडराजा /  ज्ञानेश्वर तिकटे

सिंदखेड राजा :-  तालुक्यामध्ये अतिवृष्टी (Heavy Rainfall) आणि सततच्या पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेले शासकीय अनुदान मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा झाले आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांची eKYC (इलेक्ट्रॉनिक नो युवर कस्टमर) प्रक्रिया प्रलंबित आहे, त्यांच्या खात्यात अद्याप हे अनुदान जमा झालेले नाही.

तहसीलदार सिंदखेडराजा श्री.अजित दिवटे यांनी अशा सर्व शेतकरी बांधवांना आवाहन केले आहे की, त्यांनी तात्काळ आपल्या जवळच्या CSC केंद्रावर (सामान्य सेवा केंद्र) जाऊन आपली eKYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. जेणेकरून त्यांना अनुदानाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होऊ शकेल.

 *eKYC साठी विशेष शिबीराचे आयोजन*

eKYC प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यासाठी उद्या, दिनांक २७/११/२०२५ रोजी सिंदखेडराजा तालुक्यात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

*शिबिराची ठिकाणे:*

- तहसील कार्यालय, सिंदखेडराजा - किनगाव राजा (मंडळ स्तर) - दुसरबीड (मंडळ स्तर) - सोनोशी (मंडळ स्तर) - मलकापूर पांग्रा (मंडळ स्तर) - शेंदुर्जन (मंडळ स्तर) - साखरखेर्डा (मंडळ स्तर)

श्री. अजित दिवटे, तहसीलदार सिंदखेडराजा यांनी सर्व शेतकरी बांधवांना या शिबिराचा लाभ घेऊन आपली eKYC प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी आणि अनुदानापासून वंचित राहू नये, असे कळकळीचे आवाहन केले आहे.