अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
जालना जिल्ह्यातील अंबड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये भारतीय जनता पार्टीने वर्चस्व सिद्ध करत दणदणीत यश संपादन केले आहे.भाजपकडून नगरसेवक पदासाठी प्रभाग २ मधून उमेदवारी मिळालेल्या सौ.सविताताई सौरभ कुलकर्णी याना ११५५ मते मिळाली व उज्वल देविदास कुचे यांनी १०९६ मते घेऊन आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत निर्विवाद विजय मिळवला.त्यांच्या या विजयामुळे अंबड शहरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांनी अंबड नगरपरिषद निवडणुकीची सर्व सूत्रे प्रभावीपणे हाती घेतली होती. त्यांच्या अचूक रणनीती,संघटन कौशल्य आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे भाजपचे उमेदवार निवडणूक रिंगणात मजबूतपणे उभे राहिले.विशेष बाब म्हणजे,आमदार कुचे यांच्या नेतृत्वाखाली अंबड नगरपरिषद निवडणूक लढवणारे नगराध्यक्ष पदाची उमेदवार व २० भाजपचे २ राष्ट्रीय समाज पक्षाचे नगरसेवक नगर परिषद मध्ये उमेदवार उभे होते.यापैकी भाजपचे १४ व राष्ट्रीय समाज पक्षाचे २ उमेदवार विजयी झाले.याचबरोबर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.देवयानीताई केदार कुलकर्णी यांनीही विजय मिळवत भाजपच्या यशात मोठी भर घातली आहे.विजयानंतर बोलताना सविताताई सौरभ कुलकर्णी यांनी मतदारांचे आभार मानत,“हा विजय जनतेच्या विश्वासाचा आहे.अंबड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून नागरिकांच्या अपेक्षांवर खरे उतरू,”असा विश्वास व्यक्त केला.या निवडणुकीतील निकालामुळे अंबड शहराच्या राजकारणात भाजपची पकड अधिक मजबूत झाली असून,आगामी काळात शहराच्या विकासाला गती मिळेल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





Social Plugin