Ticker

6/recent/ticker-posts

दिनांक 25 मार्च रोजी घोषित झालेल्या नवोदय परीक्षेच्या निकालात सहकार विद्या मंदिर बिबी शाळेचा विद्यार्थी सार्थक जगदीश नागरे याची निवड झाली .

 


प्रतिनिधी : अशोक ढाकणे(सिंदखेड राजा)

दिनांक 25 मार्च रोजी घोषित झालेल्या नवोदय परीक्षेच्या निकालात सहकार विद्या मंदिर बिबी शाळेचा विद्यार्थी सार्थक जगदीश नागरे याची निवड झाली असून. त्याचे इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण नवोदय विद्यालय शेगाव येथे होणार असून, हे संपूर्ण शिक्षण मोफत असणार आहे. ग्रामीण भागातील प्रतिभावान विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी भारत सरकार शिक्षण मंत्रालयामार्फत नवोदय निवड समिती नवोदय विद्यालयासाठी परीक्षेचे आयोजन करत असते. अनेक पालकांची आपल्या पाल्याची या शाळेसाठी निवड व्हावी अशी इच्छा असते त्या प्रमाणे पालक विद्यार्थ्यांची विशेष तयारी करून घेत असतात. 

जानेवारी महिन्यात झालेल्या या परीक्षेत जिल्हाभरातील हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते त्यातील ग्रामीण भागातून सहकार विद्या मंदिर शाळेच्या विद्यार्थी सार्थक जगदीश नागरे याची निवड झाली असून शाळेसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट असून. या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन त्याचे कुटुंब , वर्गशिक्षक मोरे सर त्याचबरोबर लहाने सर यांनी केले असून शाळेच्या वतीने मुख्याध्यापक इंगळेसर यांच्या हस्ते सार्थक व त्याच्या वडिलांचा विशेष सत्कार करण्यात आला. संस्थेचे संस्थापकअध्यक्ष भाईजी , सौ कोमलताई झवर संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री सुखेशजी झवर साहेब यांनी सार्थकच्या यशाचं कौतुक केले असून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहे.