प्रतिनिधी (अशोक ढाकणे)
दिनांक 9 डिसेंबर रोजी लोणार येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले त्याचबरोबर निबंध लेखन स्पर्धा समय सूचक स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते लोणार येथील मापारी इंटरनॅशनल स्कूल येथे या स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेत सहकार विद्या मंदिर बीबी शाळेचे विद्यार्थी कुमारी विधी माळोदे हिने समय सूचक स्पर्धेत सुंदर असे भाषण सादर करून प्रथम क्रमांक पटकावला तर नववी ते बारावी या गटात प्रश्नमंजुषा स्पर्धेत वर्ग दहावीचा विद्यार्थी उज्वल डोंगरदिवे याने प्रथम क्रमांक पटकाविला. यावेळी गटशिक्षणाधिकारी केंद्रप्रमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शाळेच्या शिक्षिका किंगरे मॅडम व तसेच विज्ञान विषयाचे शिक्षक बरहांडे सर यांनी केले असून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाईजी, विद्यमान अध्यक्ष डॉक्टर सुखेशजी झंवरसाहेब व सौ. अध्यक्षा कोमलजी झंवर यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक सचिन खरात सर यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकांवृंद यांंनी अभिनंदन केले





Social Plugin