Ticker

6/recent/ticker-posts

भोकरदन शहरातील 26 मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात.

 


प्रतिनिधी: निरंजन बावस्कर 

भोकरदन: भोकरदन नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी(मंगळवारी) दिनांक २/१२/२०२५ मतदानाला सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदारांची गर्दी पाहायला मिळाली. 

   शहरातील 26 मतदान केंद्रावर २० हजार ९१६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामध्ये महिला१० हजार १० मतदार आहे व पुरुष१० हजार ९०६  मतदार आहेत. या निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. आशाताई एकनाथ माळी, काँग्रेसच्या प्रियांका प्रतीक देशमुख शरद चंद्र पवार गटाच्या समरीन मिर्झा बेग तसेच अजित पवार सायना कुरेशी रिंगणात आहे. तर नगरसेवक पदासाठी ७० उमेदवार रिंगणात आहे. या निवडणुकीत केवळ दोनच उमेदवार अपक्ष म्हणून उभे आहेत.

   या निवडणुकीमध्ये भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट ,शिवसेना , शिवसेना उद्धव गट व आजचे उमेदवार आपले नशीब आजमावत आहे.