अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्था आयोजित भव्य माऊली मंदीराचा कलशारोहण सोहळा होणार आहे.तरी परीसरातील भाविक भक्तांनी कार्यक्रम चा लाभ घ्यावा असे आवाहन ह.भ.प भागवत महाराज दोबाले यांनी केले आहे.
दोन दिवस हा कार्यक्रम पार पडणार आहे.दि ६ डिसेंबर रोजी महायज्ञ कलशपुजन आहे.दि ७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता कलशारोहण किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.२०० टाळकरी, संत महंत मंडळींच्या उपस्थितीत हा भव्य माऊली मंदिराचा सोहळा संपन्न होणार आहे.तरी गावातील व परिसरातील भाविक भक्तांनी व नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन भागवत महाराज दोबाले यांनी केले आहे.





Social Plugin