भगवान ढगे अंतरगाव प्रतिनिधी नायगाव...
दि.02/12/2025 वार मंगळवार नायगाव तालुक्यातील कृष्णुर एमआयडीसी परिसरात दि.29/11/2025 वार शनिवारी एका कंपनीमधील युवकाच्या अंगावर काम करत असताना बिबट्याने अचानक हल्ला केला बिबट्याच्या हल्ल्यात तो युवक किरकोळ जखमी झाला श्रीकांत पोपुलवाड त्या जखमी झालेल्या युवकांचे नाव आहे आरडाओरडा केल्यास तेथून बिबट्या निसटला त्या युवकाचे प्राथमिक उपचार करण्यात आले ही माहिती वन विभागाला कळताच वन विभागाने त्या कंपनीमध्ये पिंजरा लावला पण बिबट्या तिथून निसटला असल्यामुळे वन विभागाचा प्रयत्न निष्फळ ठरला त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे आणि बनावट फोटो व्हिडिओ मुळे नागरिक शेतकरी त्रस्त झाले आहेत या सर्व गोष्टीकडे वन विभागाने काळजीपूर्वक लक्ष घालावे यात वन विभागाने निष्काळजी करू नये अशी शेतकरी नागरिकांचे म्हणणे आहे व त्याचबरोबर आज दि.01/12/2025 वार सोमवारी संध्याकाळी सातच्या सुमारास रुई इज्जतगाव या परिसरात बिबट्याचे दर्शन झाले आहे असा सोशल मीडियावर व्हिडिओ मेसेज व्हायरल होत आहे त्यामुळे वन विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे यात वन विभागाचा हलकर्जीपणा होत आहे असे शेतकरी वर्गात संताप व्यक्त होत आहे व भीतीचे वातावरण पसरत आहे सध्या शेतीची कामे जमात चालू असताना पिकाला पाणी देण्यासाठी रात्रपाळी चालू आहे त्यासाठी वन विभागाने हलकर्जीपणा न करता ताबडतोब उपाय योजना करून बिबट्याला पकडण्यात यावे असे आवाहन शेतकरी वर्गा तर्फे होत आहे तरी वन विभागाने लवकरात लवकर उपाययोजना करून बिबट्याला पकडण्यात यावे ही शेतकरी वर्गातून विनंती.





Social Plugin